महत्वाच्या बातम्या

 पीक विमा योजनेचा एक रुपयात लाभ घ्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासांठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तसेच शेतकरी हिस्स्याची हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बॅक विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र सीएससी यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.

पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४० देण्यात येते. या व्यतिरिक्त जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी धारकांनी शेतकऱ्यांकडून अतिरीक्त पैसे घेवु नये. आपले सरकार सेवा केंद्र सीएससी धारकांकडून केवळ १ रुपया भरुन पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी व सीएससी ने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच अधिक्षक कृषि अधिकारी या कार्यालयांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos