‘टायटॅनिक’ या जगप्रसिद्ध जहाजाला जलसमाधी देणारा 'जॅकोबशवन ' नावाचा हिमनग वाढतोय!


वृत्तसंस्था  / नवीदिल्ली :  ‘टायटॅनिक’ या जगप्रसिद्ध जहाजाला समुद्रात जलसमाधी मिळाली होती. या जहाजाला बुडविणारा आणि जागतिक तापमानवाढीची चाहूल ज्या हिमनगाच्या वितळण्यामुळे जगाला लागली तो ग्रीनलॅण्डमधील जॅकोबशवन नावाचा हिमनग आता वितळण्याऐवजी वाढत आहे, असा अहवाल  ‘नासा’च्या अभ्यासकांनी  नमूद केला आहे. 
ग्रीनलॅण्डमधील सर्वात मोठ्या हिमनगांपैकी एक असणाऱ्या जॅकोबशवनचा आकार १९ व्या शतकामध्ये ४० किलोमीटरने कमी झाल्याचे संशोधकांचे म्हणणे होते. मात्र ‘नासा’ने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामध्ये या हिमनगाचा वितळण्याचा वेग मंदावल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर या हिमनगाचा आकार आता हळूहळू वाढत असल्याचेही ‘नासा’च्या अभ्यासकांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.
नेचर जिओसायन्स नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालामध्ये जॅकोबशवन हिमनगासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. २०१६ पासून या हिमनगावरील बर्फाची जाडी वाढली आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान थंड असल्याने या हिमनगावरील बर्फाची जाडी वाढत असल्याचे निरिक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे. यामुळेच हा हिमनग आता वितळण्याऐवजी आकाराने वाढताना दिसत आहे. जाडी वाढल्याने या हिमनगाची हलचाल संथ झाली असून त्याचा पाण्याखालील भाग आकाराने वाढत असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. उत्तर अटलांटिक महासागरामधून आर्टिक महासागरामध्ये थंड पाण्याचा प्रवाह येत असल्याने हा बदल दिसून येत असल्याचे संशोधक सांगतात.   Print


News - World | Posted : 2019-03-27


Related Photos