कोरची पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्याने झाडली स्वतःवर गोळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची
: स्थानिक पोलिस ठाण्यात कार्यरत एका पोलिस कर्मचार्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना आज २७ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.
पतीराम मंसाराम दर्रो (४८) असे पोलिस कर्मचार्याचे नाव असून या घटनेत ते  गंभीर जखमी झाले आहेत.   उपचारासाठी नागपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या पोटाजवळ  गोळी लागली आहे. यामुळे प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कौटूंबिक वादातून पतीराम दर्रो यांनी स्वतःवर   गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-27


Related Photos