८०० रूपयांच्या लाचेसाठी कामठा येथील तलाठी वंदना डोंगरे एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया
: मृतकाच्या मुलांच्या नावे शेतीचे फेरफार घेण्यासाठी ८०० रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कामठा ता.जि. गोंदिया येथील तलाठी वंदना बुधराम डोंगरे व खासगी इसम गणेश महादू कोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई काल २६ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया ने केली आहे.
फेरफार घेण्यासाठी तलाठी डोंगरे ने एक हजार रूपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे २५ मार्च रोजी तक्रार केली. यानंतर काल 26 मार्च रोजी सापळा रचण्यात आला. कारवाई दरम्यान तडजोडीअंती गणेश महादू कोरे याच्या मार्फतीने ८०० रूपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार प्रदिप तुळसकर, राजेश शेंद्रे, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, वंदना बिसेन, चालक देवानंद मारबते आदींनी केली आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-03-27


Related Photos