महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१० जुलै महत्वाच्या घटना

१८९० : वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.

१९१३ : कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.

१९२३ : मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.

१९२५ : अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.

१९२५ : तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.

१९४० : बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.

१९४७ : मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

१९६२ : टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.

१९७३ : पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.

१९७३ : बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९७८ : मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.

१९७८ : मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.

१९९२ : मादकद्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

१९९२ : आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.

१९९२ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.

१९९५ : म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.

२००० : मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

२००० : नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.

१८०० : फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.

१० जुलै जन्म

१९०३ : साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.

१९१३ : कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)

१९१४ : सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९२)

१९२१ : स्माईली चे निर्माते हार्वे बॉल यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००१)

१९२३ : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)

१९३४ : पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक डॉ. रजनीकांत आरोळे यांचा सुपे अहमदनगर येथे जन्म.

१९४० : अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्म.

१९४३ : अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)

१९४५ : इंग्लिश टेनिस खेळाडू व्हर्जिनिया वेड यांचा जन्म.

१९४९ : क्रिकेटपटू समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.

१९५० : पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म.

१० जुलै मृत्यू

१५५९ : फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५१९)

१९६९ : इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. (जन्म: ३० मे १८९४)

१९७० : आईसलँडचे पंतप्रधान ब्यार्नी बेनेडिक्ट्सन यांचे निधन.

१९७१ : भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८८७)

१९८९ : साम्यवादी विचारवंत साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचे निधन.

१९९५ : गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर यांचे निधन.

२००० : भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०९)

२००५ : पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)

२०१३ : भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२२)

२०१४ : भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक जोहरा सेहगल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९१२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos