चातगाव- कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी रचलेला भूसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
धानोरा तालुक्यातील चातगाव- कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी घातपात करण्याच्या उद्देशाने ५ किलो  भूसुरुंग पेरून ठेवले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळ गाठून भूसुरुंग निकामी करून जप्त केले.  
जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १८ किमी अंतरावर असलेल्या चातगाव- कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके पेरून ठेवले होते . याबातची माहिती पोलिसांच्या हाती लागताच बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले . पथकाने मोठ्या शिताफीने रस्त्यावर पेरून ठेवलेले स्फोटके निकामी करून पुन्हा एकदा नक्षल्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-26


Related Photos