महत्वाच्या बातम्या

 सोशल मीडियावर ट्विटर किलर थ्रेडसचा धुमाकूळ : तीन दिवसांत ५ कोटी डाऊनलोड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सोशल मीडियावर ट्विटर किलर थ्रेड्स असा धुमाकूळ सध्या सुरू असून ५ जुलैला रात्री ११.३० वाजता लॉन्च झालेले मार्क झुकेरबर्ग यांचे थ्रेड ऍप अवघ्या दोन तासांत ५० लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले.

२४ तासांनंतर डाउनलोड करणाऱ्यांची संख्या १ कोटी आणि ३ दिवसांत ती ५ कोटींवर पोहोचली.

थ्रेड्स हे इंस्टाग्रामने तयार केलेले मायक्रोब्लॉगिंग ऍप आहे. हे ऍप लाँच होताच जगभरातील तरुणांची पसंती याला मिळत आहे. त्यामुळे हे ऍप थेट ट्विटरलाच टक्कर देत आहे. नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल करीत ट्विटरला डिवचले आहे. विशेष म्हणजे या मीम्स पोस्ट करण्यासाठी नेटकऱ्यांनी ट्विटरचाच पर्याय निवडला. ट्विटरच्या वापरावर बंधने आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्विटरला पर्याय म्हणून थ्रेड्स ला पसंती मिळत आहे.

थ्रेड्स ऍप वापरण्यासाठी, युझर्सना त्यांचे आरोग्य, फिटनेस, आर्थिक, कंटेंट, ब्राउझिंग हिस्ट्री, डेटा, ठिकाणे इत्यादींबद्दल माहिती द्यावी लागेल. थ्रेड्सचे गोपनीयता धोरण फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखेच आहे, असे मेटाचे उपाध्यक्ष कॉनर हेस यांनी सांगितले.

असे आहे ऍप -

- मेटाने १०० देशांमध्ये थ्रेड्स लाँच केले आहे.

- सध्या हे ऍप मोफत आहे. इंस्टाग्राम ऍप असल्याने इंस्टाग्रामप्रमाणे थ्रेड्स युजर्स एकमेकांना फॉलॉ करू शकतात. मित्रांसोबत कनेक्ट होता येते.

- थ्रेड्स वर ५०० शब्दांपर्यंत पोस्ट करण्याची मर्यादा आहे. तसेच फोटो, पाच मिनिटांपर्यंतचे व्हिडीओ पोस्ट करता येतील.

- आयओएस आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे किंवा त्याच्या आयडी आणि पासवर्डद्वारे लॉगीन करता येईल.





  Print






News - World




Related Photos