महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे कॉमन मॅनचे रेखाटले व्यंगचित्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : प्रसिद्ध व्यंगचित्रकार पदमविभूषण पुरस्कार प्राप्त आर.के. लक्ष्मण यांनी अर्धशतक भर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये व्यंगचित्र रेखाटली. त्यांचे कॉमन मॅन हे व्यंगचित्र बरेच गाजले. आर.के. लक्ष्मण यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे अचूक भान होते. हेच भान त्यांच्या कॉमन मॅन मधून व्यक्त होते. रविंद्र सिंह परदेशी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी त्याचाच भाग म्हणून सामान्य माणूस म्हणजेच कॉमन मॅन ही संकल्पना केंद्रबिंदू ठरविले आहे.

महाराष्ट्र पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहेत, त्या अनुषंगाने पोलीस ठाणे सिंदेवाही येथे आर.के. लक्ष्मण यांना स्मरण करून सामान्य माणूस कॉमन मॅन यास केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य न्याय मिळावा याबाबत प्रयत्न करीत आहे. हे रेखाचित्रे सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे रेखाटले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos