महत्वाच्या बातम्या

 मुल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स च्या वतीने वनमहोत्सव व वृक्षरोपण दिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स च्या वतीने ८ जुलै ला गांधी चौक येथे वनमहोत्सव दिनानिमित्य वर्ग ८ व ९ च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून झाडे लावा, झाडे जगवा वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश जनतेला दिला. यावेळी नगरातील प्रतिष्ठित नागरीकांना झाडांची रोपं भेट देण्यात आले. शाळेच्या परिसरात वृक्षरोपनच कार्यक्रम घेण्यात आला. 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आशा शेंडे अध्यक्ष नागपूर विभाग नैसर्गिक संवर्धन विभाग, श्रीरंग नागोशे विभागीय उपाध्यक्ष नैसर्गिक विभाग, भाऊराव झाडे अध्यक्ष दिशा फाउंडेशन चंद्रपूर, मुख्याध्यापक रीमा कांबळे, उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद उपस्थित होते.

मान्यवरांनी पर्यावरणाचे महत्त्व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos