अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी / पिंपळगाव येथील जवानाचा आजारपणामुळे मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी/ पिंपळगाव येथील रहिवासी असलेले व त्रिपुरा स्टेट रायफलच्या ३ बटालियन मध्ये कार्यरत  जवान अतिराज भाऊराव भेंडारकर यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज २५ मार्च रोजी  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 गोंदिया पोलीस मुख्यालयात पोलीस विभागाच्यावतीने शहिदाला आदरांजली वाहण्यात आली. अतिराज आजारी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना २३ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्रिपुरा येथून त्यांचे पार्थिव विमानाने रायपूर विमानतळावर आणण्यात आले. तेथून गोंदियाला आणण्यात आले आहे.  खांबी/ पिंपळगाव येथे   जन्मगावी त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.  Print


News - Gondia | Posted : 2019-03-25


Related Photos