भारतीय हवाई दलात अत्याधुनिक अशा चिनूक हेलिकॉप्टरचा समावेश


वृत्तसंस्था / चंदीगड : भारतीय हवाई दलात अत्याधुनिक अशा चिनूक हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद वाढली असून पाकिस्तानच्या सीमेवर हे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापतींना लगाम बसणार असल्याचं हवाई दलाकडून सांगण्यात आलं. 
भारतीय हवाई दलाचेच प्रमुख बी.एस. धनोआ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात चार चिनूक हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल करण्यात आले. 'हे चारही हेलिकॉप्टर राष्ट्राची संपत्ती आहे. सुरक्षेच्या पातळीवर देश सध्या अनेक आव्हानांचा सामना करत असून चिनूकची हवाई दलात एन्ट्री झाल्याने ते गेम चेंजर ठरणार आहे, असं धनोआ यांनी सांगितलं. 
यावेळी धनोआ यांनी राफेल विमानांचाही उल्लेख केला. राफेल विमान हवाई दलाच्या ताफ्यात आल्यानंतर पाकिस्तानचं कोणतंही विमान नियंत्रण रेषेवर आणि सीमेवरही येणार नाही. राफेलमुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढेल. त्यामुळे पाकिस्तान आपल्याला प्रत्युत्तरही देऊ शकणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


वैशिष्ट्ये : 

- व्हिएतनामच्या युद्धात चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आलेला आहे. 
- अफगाणिस्तान आणि इराकमध्येही चिनूकचा वापर करण्यात आला होता  
- ११ हजार किलो शस्त्रास्त्र आणि सैनिकांना वाहून नेण्याची क्षमता 
-  हे मल्टी मिशन हेलिकॉप्टर बोइंग कंपनीने तयार केले आहे 
- हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये हे हेलिकॉप्टर उपयोगी ठरणारं आहे, खोऱ्यांमध्ये आणि छोट्या हेलिपॅडवर सुद्धा हे हेलिकॉप्टर लँड करता येतं 
- या हेलिकॉप्टरचा आतापर्यंत १९ देशांनी वापर केलाय 
-  अमेरिकेच्या हवाई दलात १९६२ पासूनच हे हेलिकॉप्टर दाखल आहे 
- भारताने १५ चिनूक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला आहे 
- खराब हवामानातही हे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकते, या हेलिकॉप्टरचा वेग ताशी ३१५ किलोमीटर एवढा आहे.  Print


News - World | Posted : 2019-03-25


Related Photos