इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत राहुल गांधी यांचा 'गरिबी हटाव' चा नारा


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सत्तरच्या दशकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'गरिबी हटाव' चा नारा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही 'न्याय स्किम'च्या माध्यमातून गरिबी हटावचा नारा दिला आहे. महिन्याला १२ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्यात येईल, अशी घोषणाच राहुल गांधी यांनी केली. या स्किमबाबत अर्थतज्ज्ञांशी विचार विनिमय केला असून या योजनेचा देशातील ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. गेल्या पाच वर्षात देशातील गोरगरिबांची फसवणूक झाली आहे. देशातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. मात्र आता देशात आमचं सरकार आल्यास 'न्याय स्किम'च्याद्वारे आम्ही देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ. ज्यांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कमकुवत घटकातील लोकांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपये करण्यात येईल. म्हणजे एखाद्या व्यक्तिला महिन्याला ८ हजार रुपये पगार मिळत असेल तर सरकारच्यावतीनं त्याला आणखी ४ हजार रुपये दिले जातील. अशा तऱ्हेने त्यांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपयांवर नेलं जाईल. त्याचा देशातील २५ कोटी जनतेला थेट फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.    Print


News - World | Posted : 2019-03-25


Related Photos