महत्वाच्या बातम्या

 मागासवर्गीय मुलांमुलींसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशाची प्रक्रीया सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा सुरु झालेली असून चालू शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

सन २०२३-२४ च्या  रिक्त जागेसाठी वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी १२ जुलै असून पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याची मुदत १४ जुलै आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतीम मुदत २३ जुलै असून रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याची मुदत २६ जुलै आहे.  दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश २ ऑगस्ट पर्यंत देण्यात यईल. 

दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) आणि बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका, पदवी आणि एम.ए., एम कॉम, एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका आदी अभ्यासक्रमासाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी ३१ जुलै असून पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याची मुदत ७ ऑगस्ट आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतीम मुदत १७ ऑगस्ट असून रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याची मुदत २३ ऑगस्ट आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश ३१ ऑगस्ट पर्यंत देण्यात यईल.  

ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावायाचा आहे. त्यांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वसंत नगर चोखामेळा परिसर, दीक्षाभूमी चौक, नागपूर येथून अर्ज प्राप्त करुन निर्धारीत मुदतीत सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos