महत्वाच्या बातम्या

 सुरज पेदूलवार यांची जिल्हास्तरीय नियंत्रण समितीवर निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : समाजकल्याण विभाग चंद्रपुर अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दिव्यांग व्यक्तीसाठी राखिव ठेवण्यात येणाऱ्या निधीचे जिल्हास्तरीय नियंत्रण समिती मध्ये सुरज पेदुलवार यांची अशासकीय सदस्य पदी निवड झाली आहे.

सुरज पेदुलवार हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. महाविद्यालयीन जीवनात असताना २०१४ - १५ मध्ये विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. याशिवाय लोकसभा खासदार आणि महाराष्ट्र विधानसभेच्या आमदार निवडणुकी दरम्यान कॉलेज ब्रँड ॲम्बेसेंडर म्हणून देखील काम केलेले आहे. २०१४ मध्ये निवडणुकीसाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची  जबाबदारी त्यांच्यावर होती. 

२०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्टेट कमिटी मेंबर आणि जिल्हा समन्वयक म्हणून देखील महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. याशिवाय नुकत्याच २०२२ मध्ये आलेल्या कोरोना महामारी दरम्यान सामाजिक कार्य केले. त्यासाठी विदर्भ बेलदार समाजाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला होता.





  Print






News - Chandrapur




Related Photos