'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :   
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री केली. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात रविवारी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.
 लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन एका कारमधून तीन जण प्रवास करीत होते. कारच्या तपासणीसाठी या तिघांना श्रीनगरच्या बाहेर परिमपोरा नाक्यावर थांबवण्यात आले. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याचं समोर आलं. तीनही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळत मिळाली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे.     Print


News - World | Posted : 2019-03-25


Related Photos