महत्वाच्या बातम्या

 बेडगाव वनपरीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी शासकीय नर्सरीत कार्यालयीन वेळेत केली दारूची पार्टी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका अंतर्गत येत असलेल्या बेडगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेले वनरक्षक वाघाडे व राऊंड ऑफिसर गहाणे यांनी वन विभागाच्या मोहगाव येथील नर्सरीत कार्यालयीन वेळेत दारूची पार्टी असून व तिथेच जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. दोघेही कर्मचारी इतक्या दारूच्या नशेत होते की, त्यांना काहीही भान सुद्धा नव्हते. मोहगाव येथील नर्सरीत नेहमी दारूची पार्टी केली जात असल्याची माहिती मागील काही दिवसांपासून प्राप्त झाली होती. परंतु काल रोपट्याच्या मागणीसाठी नर्सरी येथे गेले असता तिथे दोन्ही कर्मचारी दारूच्या नशेत धुंद दिसून आले.

तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या नर्सरीमध्ये सहलीसाठी जाणे सुद्धा योग्य नसल्याचे दिसून येत आहे. 

सदर रोपवाटिका ही रोपवाटिका नसून झुडपी जंगल असल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक जंगलाने व्यापलेल्या कोरची तालुक्यात नेहमी दारूच्या नशेत राहणारे कर्मचारी हे खरंच आपले कर्तव्य बजावीत आहेत का? हे सुद्धा खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नेहमी या नर्सरीत होणाऱ्या पार्टीचे भान वरिष्ठांना नाही का? असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. अशा कर्तव्यावर कसूर करून दारूच्या नशेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी रोजंदारीवर काम करणाऱ्या कोरची तालुक्यातील पाच मजुरांना कामातून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांचे सहा ते सात महिन्याचे वेतन सुद्धा देण्यात आले नसून आज त्या पाच मजुरांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले असल्याचे दिसून येत आहे.

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात नेहमी होतो दारूची पार्टी : 

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना सुद्धा अशी महागडी दारूची पार्टी तालुक्यातील वन विभागाचे काही कर्मचारी नियमित खुलेआम करीत असून दारूबंदी असलेला कायदा हा जिल्ह्यात फक्त कागदापूर्तीच मर्यादित आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.






  Print






News - Gadchiroli




Related Photos