महत्वाच्या बातम्या

 रोटरी क्लब वरोरा आणि भारतीय जनता पक्षाचे वतीने मॅमोग्राफी शिबिर आयोजित


- डॉक्टर्स डे निमित्त भब्य मॅमोग्राफी टेस्ट शिबिर 

- स्व.डॉ.विनायक वझे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ डॉ. सागर वझे यांचा अनोखा उपक्रम

- गरजूंच्या मदतीसाठी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : १ जुलै ते ५ जुलै दरम्यान डॉ. सागर वझे यांनी गरजू महिलांच्या मदती साठी मॅमोग्राफी शिबिर आयोजित केले. तसेच या शिबिराच्या माध्यमातून महिलांना कर्करोगापासून जागृत करणे, हा उपदेश डोळ्यासमोर वझे कुटुंबाने ठेवला, दर वर्षी ह्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. सागर वझे म्हणाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी भाजपा जिल्हा प्रमुख देवराव भोंगळे, भाजपा विधान सभा प्रमुख रमेश राजूरकर आणि सुवर्णरेखा पाटील होते. या शिबिराच्या माध्यमातून महिलांना कर्करोगाप्रती जागृत करून त्यांची तपासणी मोफत करण्यात आली. या तपासणी साठी ४ हजार / रू खर्च येतो पण या शिबिरांचे आयोजन केल्याने हा खर्च अगदी मोफत झाला. या शिबिरात ३५४ महिलाची तपासणी कण्यात आली. त्यापैकी १३४ महिलांची मॅम्मोग्राफी तपासणी झाली, या तपासणीत ६ महीला रुग्ण संशयीत आढळून आले. त्यांना पुढील तपासणीकरीता दत्ता मेघे हॉस्पीटल मध्ये पाठविण्यात आले आहे.

दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्थाआणि विनोबा भावे हाँस्पीटलच्या डॉ.स्वाती देशपांडे वरोरा उपजिल्हा रूग्णालयाचे मेडीकल अधीक्षक डॉ प्रफुल खुजे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, डॉ.भगवान गायकवाड, बाबासाहेब भागडे, सुरेश महाजन, रजुभाऊ गायकवाड, ओमभाऊ मांडवकर, कारण देवतळे, उमेश बोडेकर, सागर कोहळे तसेच रोटरी क्लब ऑफ वरोरा चे अध्यक्ष डॉ. सागर वझे, सेक्रेटरी ॲड. मधुकर फुलझले, नितेश जयस्वाल, विशाल जाजु शब्बीर बोहरा, अमित नहार, रवी शिंदे, ओमभाऊ मांडवकर डॉ. प्रदीप पराते, डॉ.जगदीश वैद्य, तसेच डॉ.विवेक तेला, डॉ.विजय चांडक, डॉ. मीरा वझे, डॉ. कपिल टोंगे ,डॉ राजेंद्र ढवस, डॉ. राहुल धांडे, डॉ.पवन डोंगरे, विजय पावडे, बाळू पिसाळ माँर्नीग वॉक ग्रुपचे देवीदास आंबीकर, समीर बारई, प्रशांत बावणे, सुधाकर कुंकूले उपस्थीतीत होते. कार्यक्रमाचे नियोजन राकेश पॉल अमित चवले यांनी केले होते. कार्यक्रम संचालन डॉ प्रशांत खुळे सर आणि आभार प्रदर्शन अदनान सद्दीकोट यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos