भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवारीची माळ भंडारा न. प. च्या अध्यक्षांच्या गळयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजप मध्ये उमेदवारा बद्दल तिढा वाढला होता.  या  संपुर्ण राजकीय नाट्याला आज सायंकाळी  ६ वाजताच्या सुमारास पडदा पडला असुन भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे.  सुनिल मेंढे हे उद्या २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता साखरकर सभागृहातुन शक्ती प्रर्दशन करीत अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्याच्या दिवसा पासुन भाजप मध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे  नाव हे प्रसार माध्यमा मध्ये प्रसिध्द होत होते. यात विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांचे  देखील नाव जोरत सुरु होते. मात्र भंडारा जिल्ह्यातील काही आमदारांच्या विरोधामुळे पक्षश्रेष्टीनी आ.परिणय फुके यांचा पत्ता कट करीत नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांना भाजपची उमेदवारी दिली असल्याने यंदा भंडारा जिल्ह्यातील उमेदवाराला जेष्ट नेत्यांनी पसंती देत भंडारा जिल्हयातील उमेदवाराला तिकीट दिल्याने भाजपला कीती फायदा होते हे आता येणारी वेळच सागणार आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-03-24


Related Photos