खा. नेते उद्या शक्तीप्रदर्शन करून आणखी दोन अर्ज दाखल करणार


- २२ मार्चला दाखल केले दोन अर्ज
- पत्रकार परिषदेतून दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणूकीसाठी उद्या २५ एप्रिल नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून विद्यमान खासदार तथा भाजपाचे उमेदवार अशोक नेते हे उद्या शक्तीप्रदर्शन करीत दोन अर्ज दाखल करणार आहेत. याआधी २२ मार्च रोजी अशोक नेते यांनी दोन नामांकन दाखल केले आहेत, अशी माहिती आज २४ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला आमदार डाॅ. देवराव होळी,   प्रमोद कडू, प्रशांत वाघरे, भारत खटी, प्रशांत भृगुवार, रमेश भुरसे, नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रकाश अर्जूनवार, रविंद्र ओल्लालवार, विलास दशमुखे, सुरेश पद्मशाली आदी उपस्थित होते.
उद्या नामांकन दाखल करण्यासाठी लोकसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पाच विधानसभा क्षेत्रातील आमदार, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. युवा मोर्चाच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. 
लोकसभा निवडणूकीसाठी एका उमेदवाराला चार नामांकन दाखल करता येतात. त्याप्रमाणे अशोक नेते यांनी २२ मार्च रोजी दोन नामांकन दाखल केले. आता उद्या दोन नामांकन दाखल करतील. लोकसभा क्षेत्रातून भाजपातर्फे विद्यमान आ. डाॅ. देवराव होळी सुध्दा शर्यतीत असल्याची चर्चा होती. त्यांनीसुध्दा दोन अर्ज घेतल्याची माहिती दिली. मात्र नामांकन दाखल करणार नसल्याचे डाॅ. होळी यांनी सांगितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-24


Related Photos