अखेर चंद्रपूरातून बाळू धानोरकर यांनाच उमेदवारी, बांगडे यांची उमेदवारी रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  चंद्रपूर मतदारसंघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, आज नव्याने   केलेल्या  यादीत त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांच्याजागी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना या मतदारसंघातून उमदेवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथील उमेदवारीवरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे भाष्य केल्याची ऑडिओ क्लिप समोर आली होती.  अखेर काँग्रेसच्या हायकमांडने येथील उमेदवार बदलला. धानोरकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना लढत देतील. त्या 
त्याचबरोबर काँग्रेसने अकोला मतदारसंघातून हिदायत पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये तर हिंगोली मतदारसंघातून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश धानोरकर यांनी गत आठवड्यात शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपा-सेना युतीवर नाराज असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, धानोरकर वारंवार काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे सांगत होते. मात्र, आता काँग्रेसने त्यांना थेटच उमदेवारी जाहीर केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-24


Related Photos