एम्प्रेस मॉलमधील हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर पोलिसांची धाड, विदेशी युवतीसह तीन तरुणी ताब्यात


- दलाल युवतीसह चौघांवर गुन्हे दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
शहरातील प्रसिद्ध एम्प्रेस मॉलमधील फिनिक्‍स मॉल नावाने असलेल्या ‘मसाज ॲण्ड स्पा’ सेंटरमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर गुन्हेशाखेने शुक्रवारी छापा टाकून  विदेशी युवतीसह तीन तरुणींना ताब्यात घेतले.  या प्रकरणी एका दलाल युवतीसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 
गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एम्प्रेस मॉलच्या पहिल्या माळ्यावर गाळा क्र. १२१ मध्ये ‘फिनिक्‍स वेलनेस सेंटर’ नावाने मनीष लांजेवार आणि ढेरेक मंचेडो यांचे दुकान आहे. येथे महिला आणि पुरुषांची मसाज थेरपी केली जाते. मनीष आणि ढेरेक यांनी गेल्या दीड वर्षांपासून सेक्‍स रॅकेट सुरू केले. मसाजच्या नावाखाली ५ प्रशस्त रूममध्ये आंबटशौकीन पुरुषांना युवतीशी शारीरिक संबंधाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे दलाल फैजान शेख हा तरुणी पुरवत होता. गेल्या काही महिन्यांपासून विदेशी तरुणींची मागणी वाढल्यामुळे फैजान आणि मनीष लांजेवार दिल्लीला गेले. तेथून नेपाळ आणि भिलाई येथील तरुणींना देहव्यापारासाठी नागपुरात आणले. दलाल तन्वी महेंद्र चोटलिया (२१) रा.  निकुंजमोहन क्‍लासिक अपार्टमेंट, गिट्टीखदान  हिच्याकडे दोन्ही तरुणींसाठी आलेल्या ग्राहकांना पैशाचा सौदा करण्याची जबाबदारी देण्यात आली. चौघांनी गेल्या दीड वर्षांपासून मोठे सेक्‍स रॅकेट उघडून लाखोंची उलाढाल केली होती. ही माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्‍त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यांनी एसएसबीचे उमेश बेसरकर, अनुपमा जगताप यांच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. पाठवलेल्या पंटरने मनीष आणि ढेरेक यांची भेट घेत सौदा केला. तन्वी चोटलियाने दोन्ही मुलींना दाखवून पंटरला रूम उपलब्ध करून नेपाळी युवतीला रूममध्ये पाठविले. पंटरने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. तन्वीसह तिन्ही युवतींना ताब्यात घेतले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-24


Related Photos