अनियंत्रीत ट्रकच्या धडकेत युवतीचा मृत्यू , दोघे जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
अनियंत्रीत ट्रकने  दिलेल्या धडकेत एका युवतीचा मृत्यू झाला तर दुसरी एक युवती आणि एक युवक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला.  
जय अंबे नगरात राहणारी पूजा गंगाधर खापेकर (२१) आणि पल्लवी केशव नागपुरे (२०) या दोन मैत्रीणी एका केबलच्या कार्यालयात काम करतात. शनिवारी रात्री काम आटोपून त्या घराकडे पायी जात होत्या. पूजाच्या घरापासून काही अंतरावर दूध गंगा वचन कंपनीच्या एमएच ४०/ बीजी ५०३२ क्रमांकाच्या  भरधाव ट्रकच्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून पूजा आणि पल्लवीला धडक मारली. त्यानंतर ट्रक  एका टपरीत  शिरला. यावेळी टपरीत गुड्डू शाहू बसून होता. तो गंभीर जखमी झाला. तेथे बसून असलेले काही लोक जीवाचा धोका लक्षात घेऊन पळून गेले. त्यामुळे ते बचावले. या अपघातानंतर तेथे मोठा तणाव निर्माण झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक उडी मारून पळून गेला. जखमी तिघांनाही डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी पूजा नागपुरेला मृत घोषित केले. पल्लवी आणि गुड्डूवर उपचार सुरू आहेत. माहिती कळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा शोध घेतला जात आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-03-24


Related Photos