४८ जागांपैकी २४ जागांवर काँग्रेस लढणार असून २० जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार , ४ जागा मित्रपक्षांना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
लोकसभा निवडणुकीसाठी संयुक्त पुरोगामी महाआघाडीचं राज्यातील जागावाटप निश्चित झालं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. 
राज्यातील ४८ जागांपैकी २४ जागांवर काँग्रेस लढणार असून २० जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी नमूद केले. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला २, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला १ आणि युवा स्वाभिमान पक्षाला १ जागा देण्यात आली आहे, असेही चव्हाण यांनी पुढे स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत १७ छोटे पक्ष सहभागी झाले असून या सर्व पक्षांची नावे चव्हाण यांनी वाचून दाखवली.    Print


News - Rajy | Posted : 2019-03-23


Related Photos