मानेमोहाळी परिसरात नदीकिनारी वाघाचे दर्शन


- वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची चमू दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मासळ (बुज) :
चिमूर तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या व ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मानेमोहाळी गावाजवळील नदीच्या किनारी शेतशिवारात वाघाचे दर्शन झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
एका इसमाला शेतशिवारात वाघ आढळून आला. याबाबत गावात माहिती पसरताच वनविभागास माहिती देण्यात आली. काही वेळातच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनासुध्दा पाचारण करण्यात आले. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-23


Related Photos