कोरेगाव येथील शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
रात्रीच्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा  मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कोरेगाव येथे काल २२ मार्च रोजीच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
योगराज भिवाजी नंदरधने (३८) रा. कोरेगाव असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. योगराज नंदरधने हे काल २२ मार्च रोजी रात्री १० वाजता नदीला लागून असलेल्या शेतात गेले. यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाही. यामुळे शोधाशोध केली असता ते मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक सिध्दानंद मांडवकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार कऱ्हाडे यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज येथील  रूग्णालयात पाठविण्यात आले. मृतक योगराज विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई - वडील, मुलगा तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-23


Related Photos