पबजी गेमवर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू, दिवसभरात फक्त सहा तासच खेळता येणार?


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : सध्या  PUBG या गेमने देशभरात अनेकांना वेड लावले आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात फक्त सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे.  पबजी या खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 माहितीनुसार, पबजी एका नव्या फीचरची चाचणी करत आहे. हेल्थ रिमाइंडर असं या फीचरचं नाव असून भारतातील अनेक शहरात याची चाचणी होत आहे. पबजीचं हे नवं फीचर आल्यानंतर युजर्स सहा तासांहून अधिक वेळ पबजी खेळू शकणार आहे. सहा तास पूर्ण झाल्यानंतर पबजी प्लेअर्सना एक नोटीफीकेशन पाठवण्यात येईल. त्यानंतर हा गेम बंद होईल. तर काही युजर्सनी पबजी खेळत असताना सुरुवातील दोन तासांनी वेळेबाबत एक मेसेज येतो त्यानंतर चार तासांनी तुमचा वेळ संपल्याचा एक मेसेज येत असल्याची माहिती दिली आहे. 
गुजरातमधील सूरत आणि राजकोटमध्ये पबजी खेळण्यावर बंदी आहे. यासंबंधीचे परिपत्रक पोलिसांनी सोशल मीडियावरून जारी केले होते. तसेच सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांना गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली होती.   Print


News - World | Posted : 2019-03-23


Related Photos