चंद्रपूरातून काँग्रेसची विनायक बांगडे यांना उमेदवारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील ५ नावांचा समावेश आहे. यात चंद्रपूर मधून  विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  भिवंडीहून सुरेश टावरे,  जालन्यातून विलास औताडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड आणि लातूरहून मच्छिलिंद्र कामंत यांचा समावेश आहे. 
चंद्रपूरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी मिळणार असे सांगितले जात होते.  तसेच, इथून नरेश पुगलिया नरेश पुगलिया, बाळू धानोरकर यांच्याही नावांची चर्चा होती. विशाल मुत्तेमवार यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने आता चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि काँग्रेसचे विनायक बांगडे यांच्यात लढत होणार आहे. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-23


Related Photos