महत्वाच्या बातम्या

 आरबीआई च्या नव्या नियमामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर बदलणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : डेबिट आणि क्रेडिट किंवा या दोन्हींपैकी एक कार्ड जरी तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, आता याच कार्ड्सच्या वापरासंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आली आहे.

थोडक्यात सांगावे तर आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकणार आहात.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार अमुक एका नेटवर्कवरच कार्ड चालेल ही अट आता शिथिल करण्यात आली असून, ते कोणत्याही नेटवर्कवर वापरता येणे शक्य होणार आहे. सदरील बदलांसंबंधीचा प्रस्तावही पुढे करण्यात आला असून, हा बदल २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू असेल.

सर्वसामानान्यांचे मत विचारात घेणार आरबीआई -

कार्डच्या नेटवर्कसंदर्भातील बदलाच्या अनुषंगाने आरबीआयने सर्वसामान्यांकडून त्यांची मतंही मागवली आहेत. कार्ड धारक आणि मर्चंट (दुकानदार) यांच्यामध्ये असणाऱ्या देवाणघेवाणीचा आणखी सुकर करण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

तुम्ही कधी खरेदीसाठी कुठे गेला असाल तर फाक क्वचितप्रसंगी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड काही ठिकाणांवर चालत नाही. कोणत्या दुकानावर खरेदीसाठी गेले असता हा प्रकार घडताना दिसतो. कारण, काही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वाईप करण्याची मुभा ठराविक दुकानदारांनाच असते. प्रत्येक दुकानदारांना याची परवानगी नसल्यामुले काही ठिकाणांवर विसा चे कार्ड चालते तर काही ठिकाणी फक्त मास्टरकार्ड आता मात्र ही परिस्थिती बदलताना दिसणार आहे.

आता नेटवर्कही निवडता येणार -

कार्डदात्या बँकेकडून कार्डधारक (खातेधारकांना) अनेक कार्ड नेटवर्कपैकी कोणताही एक पर्याय निवडण्यास सांगण्यात येईल. ज्यानंतर ग्राहकांना कार्डचा वापर करता येईल. शासनाच्या या नव्या योजनेमुळे रुपे कार्डचाही वापर वाढवण्याचा आरबीआयचा मानस असल्याचे सांगण्यात येत आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाकडून सहसा कार्डची सुविधा पुवण्यात येते. पण, त्यांच्या नेटवर्कमध्ये रुपे कार्डचा समावेश मात्र नसतो त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येतेय.

सध्याच्या घडीला कार्ड नेटवर्क आणि कार्ड देणाऱ्या बँका आणि तत्सम संस्थांमध्ये ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देण्यासंबंधी ताळमेळ साधला जात नसल्याची बाब निरीक्षणात आल्याचा मुद्दा आरबीआयनं अधोरेखित केला आहे. आरबीआयच्या मते कार्ड देणाऱ्या संस्थानकडून कार्ड नेटवर्कसंबंधी ग्राहकांना सेवेचा लाभ घेता येण्यापासून अडवेल अशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. ज्यामुळे या नवा बदल सकारात्मक परिणाम करताना दिसणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos