महत्वाच्या बातम्या

 सहायक प्राध्यापक पदासाठी पीएच.डी ची अट रद्द : यूजीसी चा महत्त्वपूर्ण निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सहायक प्राध्यापक पदासाठी आता किमान पात्रता ही नेट, सेट करण्यात आली असून, पीएच.डी ऐच्छिक करण्यात आली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. या संदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

यूजीसीकडून सहायक प्राध्यापक पदांवर थेट भरतीसाठी किमान पात्रता सेट, नेट केली असून, इतर कोणत्याही नियमांत बदल केलेला नाही. विद्यापीठ अनुदान आयाेगाने या संदर्भात ३० जून रोजी अधिसूचना जारी केली आहे. सहायक प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या नियमातील नवीन बदल १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.

यूजीसीने यापूर्वी २०१८ मध्ये विद्यापीठांसह, महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पीएच.डी पदवी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे सेट, नेट उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे सेट, नेट उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. यूजीसीने केलेल्या नवीन सुधारणेमुळे ही अट रद्द केल्यामुळे या उमेदवारांना संधी मिळणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos