घाबरू नका ! मतदान न केल्यास ३५० रुपये वजा होणार नाहीत


- होळीनिमित्त प्रकाशित केली होती बातमी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान न करणाऱ्या व्यक्तीं च्या बँक खात्यातून ३५० रुपये वजा होणार आहेत.  या मथळ्याखाली एका वृत्तसंस्थेने वृत्त प्रकाशित केले होते. विशेष म्हणजे होळीनिमित्त मस्करीत हि बातमी प्रकाशित करण्यात आली बातमीखाली तशी सूचनासुद्धा प्रकाशित करण्यात आली. मात्र या सूचनेकडे अनेकांचे लक्ष न गेल्याने त्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली होती. मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. आपण मतदान नाही केलात तरी पैसे वजा होणार नाहीत. मात्र देशाचे सजग नागरिक म्हणून मतदानांत नक्कीच सहभागी व्हा. 
वृत्तात म्हटले होते कि, आयोगच्या प्रवक्त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. देशातील सर्वच मतदारांना लक्षात घेऊनच मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते. त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च वायपट जातो. प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला ३५० रुपये खर्च येतो. म्हणूनच, जो मतदार मतदान करणार नाही, त्या मतदाराकडून निवडणूक आयोग ३५० रुपये वसुल करणार आहे.
विशेष म्हणजे ज्या मतदारांचे बँक अकाऊंट नसेल, त्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना हे ३५० रुपये वसुल केले जाणार आहेत. त्यासाठी कमीत-कमी ३५० रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी रकमेचा रिचार्ज फोनवरुन होणार नाही. विशेष म्हणजे, आयोगाच्या या आदेशाविरुद्ध कुणीही न्यायालयात दाद मागू नये, यासाठी अगोदरच आयोगाने न्यायालयाकडून या आदेशाची परवानगी घेतली आहे. दरम्यान, देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून  ७ टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. तर २३ मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार सध्या देशात आदर्श आचासंहित लागू करण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले होते. 
तसेच वृत्ताच्या शेवटी 'बुरा न मानो होली है, आज होळीनिमित्त ही बातमी प्रसिद्ध करण्यात येत असून निवडणूक आयोगाने अशी शक्कल लढवायला हवी' असे नमूद करण्यात आले. मात्र याकडे कुणाचे लक्षच गेले नाही आणि चर्चा रंगू लागल्या.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-22


Related Photos