महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


- शासन आपल्या दारी अभियान

- मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

१३ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज येथे आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात सनसूर सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वर्धा, धुत ट्रान्समिशन संभाजीनगर, पटले स्कील एज्युकेशन नागपूर, प्यजिओ व्हेईकल्स पुणे, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी वर्धा, सखी गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वर्धा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक वर्धा तसेच प्लेसमेंट एजन्सीज अशा नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्याकडील रिक्त असलेल्या पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

सदर मेळाव्यास दहावी, बारावी, पदवी व आयटीआय इत्यादी विविध शैक्षणिक पात्रता धारक नोकरी इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतात. यासाठी उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्ड, सर्व शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स, आधारकार्ड, फोटो इत्यादी कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos