लोकसभा, विधानसभा निवडणूकीवर बहिष्काराचे आवाहन करणारे नक्षल्यांचे बॅनर ग्रामस्थांनी जाळले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
धानोरा तालुक्यातील काकडयेली जवळील रांगी नाल्याजवळ लोकसभा व विधानसभा निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे बॅनर नक्षल्यांनी लावले होते. हे बॅनर नागरीकांनी जाळून नक्षल्यांचा निषेध केला आहे. 
काकडयेली येथील असंख्य महिला, पुरूषांनी बॅनर काढून जाळून टाकले. तसेच नक्षलवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी पत्रके, बॅनर बांधून निवडणूकीवर बहिष्काराचे आवाहन करण्याचे सुरू केले आहे. मात्र नागरीकांनी निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. निवडणूकीसाठी तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-22


Related Photos