लोकसभा निवडणुकीत 'सोशल मीडिया' ठरणार प्रचाराचे प्रभावी माध्यम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या सोशल मीडिया ची चलती आहे. सर्व गोष्टी असंख्य लोकांना एका सेकंदात पोहचायला लागल्या आहेत. इतकेच नाही तर लोक वृत्तपत्रांपेक्षा ऑनलाईन मीडिया कडे वळले आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर नक्कीच होणार आहे. 
गेल्या काही वर्षात निवडणुकीच्या प्रचाराची पारंपरिक पद्धत बदलली असली तरी प्रचार सभा, रॅली, वैयक्तीक गाठीभेटी यासारखे प्रकार आजही सुरू आहेत. पण, आता त्यात नवीन तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे या निवडणुकीत थोडे वेगळे चित्र दिसायला मिळणार आहे. काही राजकीय पक्षांचे अजून उमेदवार निश्चित झाले नसले तरी पक्षपातळीवर मात्र वेगवेगळ्या कल्पना समोर येत आहेत. त्यातून कोणती कल्पना आपल्याला योग्य राहील यावर विचार केला जात आहे. 
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून पक्षाची राजकीय भूमिका सांगण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मतदार संघातील प्रश्नांचाही यात ऊहापोह केला जाणार आहे. फेसबुक, व्हॉटॲप या माध्यमाला  मोठी पसंती आहे.   यापेक्षा वेगवेगळ्या सोशल मीडियांच्या आयुधांचा वापरही या निवडणुकीत केला जाणार आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-22


Related Photos