भाजपाची पहिली यादी जाहीर , गडचिरोली - चिमूर साठी अशोक नेते यांना उमेदवारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी अखेर आज २१ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर अमित शहा गांधीनगर मधून लोकसभा निवडणूक लढविणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.  पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहिर केली. यात महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे-

नंदूरबार - डॉ. हिना गावीत
धुळे - डॉ. सुभाष भामरे
रावेर - रक्षा खडसे
नागपूर - नितीन गडकरी
वर्धा - रामदास तडस
गडचिरोली - अशोक नेते 
अकोला - संजय धोत्रे 
चंद्रपूर - हंसराज अहिर 
भिवंडी - कपिल पाटील 
जालना - रावसाहेब दानवे 
उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी 
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन 
नगर - सुजय विखे पाटील 
बीड - प्रीतम मुंडे 
लातूर - सुधाकरराव श्रृंगारे 
सांगली - संजय पाटील
   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-21


Related Photos