गडचिरोली - आरमोरी मार्गावर काळी - पिवळीच्या अपघातात १ ठार, १२ प्रवासी जखमी


- मोहझरी जवळील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली आरमोरी मार्गावरील मोहझरी जवळ दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात   काळी - पिवळी वाहनाने झाडाला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज २१ मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी ३.३०  वाजताच्या सुमारास घडली आहे.
नरेंद्र शालिकराम मेहरे रा. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. या अपघातातील जखमींची नावे कळू शकली नाही. एमएच ३३ - ४५४ क्रमांकाचे काळी - पिवळी वाहन गडचिरोली  कडून आरमोरीकडे येत होते. दरम्यान मोहझरी नजीक अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने  या वाहनाची झाडाला जोरदार धडक बसली. यामध्ये मेहरे हे जागीच ठार झाले. तर अन्य प्रवासी जखमी असून गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.  अपघातात मृत्यू झालेले नरेंद्र मेहरे हे मूळ आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील रहिवासी होते. मागील अनेक वर्षांपासून ते गडचिरोली येथे आरमोरी मार्गावर चहाचे दुकान चालवून आपली गुजराण करीत होते. त्यांच्या मृत्यूमुळे  मेहरे कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. त्यांच्या मागे पत्नी , एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या २२ मार्च रोजी वैरागड येथे अंत्यसंकसार केले जाणार आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-21


Related Photos