धुलीवंदनाच्या उत्साहात दुःखाचे विरजण , विद्युत तारेच्या स्पर्शाने मूलचेरा येथील दोन युवकांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा :
धुलीवंदनाच्या उत्साहावर मुलचेरा तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे.  काल २० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास शेतामध्ये  गेलेल्या  मुलचेरा येथील दोन युवकांचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला आहे.  
रमेश आत्राम  (३१), दौलत मडावी  (४१ )  अशी मृतकांची नावे आहेत.  मृतक  युवकांच्या मागे  खूप मोठा  आप्त परिवार आहे. दोन युवक मरण पावल्यामुळे मूलचेरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.  गट्टा मार्गावर  असलेल्या जगदीश हलदार यांच्या मालकी च्या शेतात मकई पिकाच्या संरक्षणासाठी  शेतात विद्युत करंट लावले होते. रात्री रमेश आत्राम व दौलत मडावी हे दोघे शेतात गेले. मात्र विद्युत तारेच्या स्पर्शाने दोघांचाही मृत्यू झाला.   विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याचे बोलल्या जात असले तरी अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास मुलचेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी मिलिंद पाठक हे करीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-21


Related Photos