महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुणघाडा (रै.) येथे शाळापूर्व तयारी दुसरा मेळावा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : ४ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुणाघाडा येथे शाळापूर्व तयारी मेळावा दुसरा घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गोटामी उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणूण वांढरे साधन व्यक्ती हे उपस्थित होते. तसेच वर्षा गौरकर, प्रीती नवघडे, रेखा हतनागर, निमाई मंडल, गेडाम, बागडे, कोठारे अंगणवाडी आणि उत्तरवार,तसेच  माता पालक वर्ग उपस्थित होते.                           

प्रथम अध्यक्षाचे हस्ते रिबीन कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. नवागत विद्यार्थ्याचे व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थी नोंदणी, वजन व उंची, शारीरिक विकास, भावनिक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी असे स्टाॅलचे टेबल लावण्यात आले होते. नवागत दाखल विद्यार्थ्यांनी प्रत्येक टेबल वर जाऊन आपले कौशल्य दाखविले. कार्यक्रमाचे सुञसंचालन कु मयुरी कुनघाडकर हिनी केले. तर आभार प्रदर्शन प्रगती दूधबडे यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos