गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदार संघासाठी ५ जणांनी केले १० अर्ज सादर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /गडचिरोली :
गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी आज ५ जणांनी १० अर्ज सादर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.
१२- गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक अधिसूचना जारी झाली असून आदर्श आचारसंहिता यापुर्वीच लागू झाली आहे.नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक २५  मार्च २०१९  आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी २६  मार्च २०१९ असून उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक २८  मार्च २०१९ आहे.
जिल्हयात मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.  निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असून यामध्ये ई-व्ही एम तसेच व्हिव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यात १९५०  हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आलेला असून निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे ॲपही निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-03-20






Related Photos