धानोरा मार्गावर ट्रक रस्ता दुभाजकावर चढला


- मध्यरात्रीची घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातील चारही मुख्य मार्गांवर मागील काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या रस्ता दुभाजकांवर वाहने चढण्याच्या घटना सुरूच आहेत. काल १९ मार्च रोजीच्या रात्री पुन्हा एक ट्रक धानोरा मार्गावरील रस्ता दुभाजकावर चढला आहे.
धानोरा मार्गावरील हिरो शारूमजवळील रस्ता दुभाजकावर रात्रीच्या सुमारास एमएच ३४ एव्ही ५६८६ क्रमांकाचा ट्रक चढला. सदर घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
शहरातून निर्माण करण्यात येत असलेला राष्ट्रीय महामार्गसुध्दा जुन्याच मार्गाएवढा तयार करण्यात येत आहे. यामुळे रस्ता दूभाजकावर वाहने चढण्याच्या घटना पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-20


Related Photos