महत्वाच्या बातम्या

 लोकशाही दिनात २ प्रकरणांचा निपटारा


विदर्भ न्युज ऍक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : दि. ३ जुलै २०२३ जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी दोन प्रलंबित व दोन नवीन प्रकरण अशा चार प्रकरणांचा  आढावा घेण्यात आला. चार प्रकरणांपैकी २ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून दोन प्रकरणावर कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये म्हाडा, नझूल व एस.एल. आर. प्रकरणांचा समावेश होता. यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख, तक्रारकर्ते उपस्थीत होते. 





  Print






News - Nagpur




Related Photos