अखेर हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी अटकेत


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. त्याला लंडन येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.  लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.
सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधात लागू करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणेने जुलै- ऑगस्टमध्ये नीरव मोदीविरोधात ब्रिटनकडे प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी केली होती. निरव मोदी लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते.    Print


News - World | Posted : 2019-03-20


Related Photos