महत्वाच्या बातम्या

  गुणवंत विद्यार्थ्यांसोबत कमी गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करुन त्यांचाही आत्मबल वाढवावे : नितेश देवगडे


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुल : आपण नेहमीच गुणवंत विद्यार्थ्याचाच गौरव करत असतो. पण कमी गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील गौरव  करायला पाहिजे तरच त्यांचा आत्मबल वाढेल व सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान होईल असे मार्गदर्शन  कार्यक्रमाचे उद्घघाटक  उपविभागीय वनअधिकारी नितेश देवगडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसमोर केले.भूमिपुत्र ब्रिगेड जिल्हा चंद्रपूर, महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, व विदर्भ तेली महासंघ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी गौरव आणिकरिअर मार्गदर्शन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अभिलाषा गावतुरे, मुख्य मार्गदर्शक,  वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वानखेडे तर मुख्य अतिथी राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त किरण गावतुरे, प्राचार्या डॉ.अनिता वाळके, विजय मुसळे, डॉ. रकेश गावतुरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले  उपस्थित होते. मार्गदर्शक डॉ. किरण वानखेडे यांनी विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविण्यासाठी जी नोकरी मिळाली तिथेच न थांबता पुढे जाण्यासाठी वेगवेळ्या मार्गातून परीक्षेतून प्रयत्न करावे असे सांगितले. विशेष अतिथी विजय मुसळे, उपायुक्त किरण गावतुरे, प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनीही स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी व यश कसे संपादन करावे यावर मौलिक विचार व्यक्त केले. 

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी  मुल जन्मापासूनच त्यांच्या मेंदीची वाढ  होत असते. परंतु त्यांना दोन वर्षापासूनच पौष्टिक, उत्तम आहार देऊन त्यांना सुदृढ करण्याची गरज आहे. असे अध्यक्षीय भाषणामधून सांगून समता,  एकता या थोर महात्म्यांच्या विचारातूनच बहुजन समाज जागृत होऊन  विकास साधता येऊ शकतो असे विचार व्यक्त केले.      
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता १२वी व १० वी मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या १२५ विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गौरव चिन्हं देऊन गौरव करण्यात आला. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अशोक झाडे, मुख्याध्यापक गंगाधर कुंनघाडकर, ज्येष्ठ पत्रकार गुरु गुरनुले, व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हसन वाढई, माजी मुख्याध्यापक बंडू गुरनुले, तैलिक महासंघाचे जिल्हा संघटक कैलाश चलाख, विषमता निर्मूलन संयोजक हिरालाल भडके, ज्येष्ठ साहित्यिक प्रब्रम्हनंद मडावी, उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी केले. सूत्र संचालन ॲड. प्रशांत सोनुले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार रोहित निकूरे यांनी मानले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ.राकेश गावतुरे यांचे नेतृत्वात राकेश मोहुर्ले यांचेसह समता परिषद, अ.भा.माळी महासंघ, भूमिपुत्र ब्रिगेडचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांसोबत पालक वर्ग उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos