पोलिस समजून नक्षल्यांनी केली निरपराध शिक्षक योगेंद्र मेश्राम यांची हत्या !


- नक्षल्यांनी पत्रके टाकून मागितली मेश्राम परिवार आणि जनतेची माफी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात नक्षल्यांनी अनेक निष्पाप नागरीकांचा बळी घेतला आहे. नुकतेच १० मार्च रोजी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात नक्षल्यांनी शिक्षक योेगेंद्र मेश्राम यांची हत्या केली. ही हत्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस समजून करण्यात आली असल्याचे नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
नक्षल्यांनी पत्रकातून मेश्राम परिवार आणि जनतेची माफी मागितली आहे. शिक्षक योगेंद्र मेश्राम यांचा काहीही दोष नव्हता. मात्र खबऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने योगेंद्र मेश्राम यांची पोलिस समजून हत्या केल्याचे नमुद केले आहे.  या पत्रकांमधून नक्षल्यांनी जनता शिक्षक, आरोग्य कर्मचारी, व्यापारी वर्गाची माफी मागितली आहे.  
गडचिरोली येथील जवाहरलाल नेहरू नगर परिषद शाळेत कंत्राटी कला शिक्षक म्हणून कार्यरत योगेंद्र मेश्राम हे कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे आरोग्य सेविका पदी कार्यरत असलेल्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते १० मार्च रोजी ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गेले. या ठिकाणी नक्षल्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. अशाच अनेक निष्पापांचा नक्षल्यांनी बळी घेतला आहे. यामुळे तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-20


Related Photos