घोसरी , नांदगाव परिसरात अस्वलाने झाडावर मांडले ठाण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी वन परिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गोवर्धन-नांदगाव दरम्यान राईस मिललगत एका निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने   दिघोरी जंगलाकडे पळ काढला.
घोसरी वनपरिक्षेत्रातंर्गत दिघोरी-उपक्षेत्रातील जंगलात बिबट, हरिण व अन्य वनप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत गावालगत शिरकाव करीत आहेत. मंगळवारी सकाळी नांदगाव-गोवर्धन दरम्यान निंबाच्या झाडावर  ठाण मांडून बसली. याबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच अस्वलाला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर वनविभागाला माहिती मिळताच वनक्षेत्र सहाय्यक अरूण पालीकोंडावार, वनरक्षक राजेंद्र लडके, पी. आर. गुटके, वनकर्मचारी चुधरी, इटेकार, श्रीधर यांच्यासह वनविभगांची चमू घटनास्थळावर दाखल झाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अस्वलाला पिटाळून लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. दरम्यान नऊ तासांच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने दिघोरी जंगलाकडे पळ काढला.  या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-20


Related Photos