३ शिवशाहीसह ८ बसेस जळून खाक : पुण्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे  :
पुणे-सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी येथे गॅरेजजवळ आज सकाळी १० च्या सुमारास बसेसना आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत ७ ते ८ गाड्या जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
शिंदेवाडी येथील गॅरेजमध्ये लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत शिवशाही बसही जळून खाक झाल्या आहेत. तर १० ते १२ खाजगी गाड्यांना आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-20


Related Photos