आचार संहिता कालावधित पोलिस विभागाची प्रतिबंधात्मक कारवाई : दारुबंदी कायदयाअंतर्गत ३११ व्यक्ती विरुध्द गुन्हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जिल्हयात आदर्श आचार सहिता लागू करण्यात आलेली आहे. निवडणूक कालावधित कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मदय निर्मिती, विक्री व वाहतुक करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ अंतर्गत अभिलेखावरील ६४ गुन्हेगारांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यातआले आहे. त्याचबरोबर फौजदारी दंड प्रक्रिया संहितेनुसार दखलपात्र गुन्हा असलेल्या ४१० व्यक्ती कडून बाँड लिहून घेण्यात आला आहे. जिल्हयात स्थापन करण्यात आलेल्या स्क्रिनींग समितीच्या
अहवालानुसार जिल्हयातील ३०१ परवानाधारक शस्त्रधारकांपैकी २७० परवाना धारकांची शस्त्रे पोलिसठाण्यात जमा करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत जिल्हयात ३११ व्यक्ती विरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून ४४ हजार ५९० लिटर दारु जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ३४ लाख ६० हजार ३३६ रुपये एवढी आहे. त्याच बरोबर ६ चारचाकी वाहन आणि १५ दूचाकी वाहने सुध्दा जप्त करण्यात आली असून याची किंमत २६ लक्ष ९५ हजार रुपये आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-03-19


Related Photos