महत्वाच्या बातम्या

 लोकबिरादरी आश्रम शाळेत प्रवेशोत्सव २०२३-२४ उत्साहात साजरा : नवागतांचे स्वागत व पालक मेळावा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : ३० जून २०२३ पासून शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले, त्यामुळे लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथे प्रवेशोत्सव २०२३-२४ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करुन पालक मेळावा घेण्यात आला.

सर्वप्रथम लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रवेशद्वारावर सर्व नवागत प्रवेशित विद्यार्थ्यांचे मान्यवर व शिक्षकांचे हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. त्यांनतर सजवलेल्या दोन वाहनांवर विद्यार्थ्यांना बसवून वाजत-गाजत रॅली काढण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार ते शाळेच्या परिसरात रॅली दाखल झाल्यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात नवागतांचे पुनश्च एकदा अभिनंदन केले. त्यानंतर शाळेच्या हॉलमध्ये पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक तथा समाजसेवक अनिकेत आमटे होते. प्रमुख अतिथी हेमलकसा गावातील सामजिक कार्यकर्ते चिन्ना महाका, भामरागड आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या अधिक्षीका गवई, लोकबिरादरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम झोडे, माजी विद्यार्थी सागर आतलामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पालकांनी आपल्या पाल्यांबद्दल घ्यावयाची काळजी, शिक्षणाचे महत्त्व, मुलींचेशिक्षण, मुलां-मुलींवर संस्कार, सुट्टीचासदुपयोग, पालक-पाल्यभेट, आजारपणात घ्यावयाची काळजी इत्यादी विषयांवर मान्यवरांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी काही पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सदर पालक मेळाव्यात २६६ पालकांची उपस्थिती होती, हे विशेष! कार्यक्रमाचे संचालन प्रा.गिरीश कुलकर्णी यांनी केले. उपस्थित पालकांचे आभार मुख्याध्यापक श्रीराम झोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अधिक्षक अशोक चापले, क्रीडा शिक्षक विवेक दुबे, अधिक्षीका ॠतुजा फडणीस, प्रा.खुशाल पवार, सुरेश गुट्टेवार, तुषार कापगते, विजया पद्मावार, शिल्पा चांगण, हिना गुट्टेवार, स्नेहल, बंडू कुडयेमी इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos