ग्रामपरिवर्तक कस्तुरे ॲसीड हल्ला प्रकरण : धर्मा राॅय याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


- कस्तुरे यांची प्रकृती गंभीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मुलेचरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत कार्यरत ग्राम परिवर्तक समाधान कस्तुरे (२५) यांच्यावर झालेल्या ॲसीड  हल्ल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा राॅय यांचा पती धर्मा राॅय याला अहेरी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ग्राम परिवर्तक कस्तुरे हे १४ मार्च रोजी आपले काम आटोपून आपल्या खोलीत झोपले होते. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडून त्यांच्यावर ॲसीड  हल्ला केला होता. या हल्ल्यात कस्तुरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान धर्मा राॅय याला शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. समाधान कस्तुरे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-19


Related Photos