विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही : राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा केला आहे.
 राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांनी राजीनामा द्यावा, असा दबाव काँग्रेसमधून त्यांच्यावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु  राधाकृष्ण विखे-पाटलांच्या राजीनाम्यासंदर्भात उठलेल्या अफवांना त्यांनीच पूर्णविराम दिला आहे. मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला आहे. सुजय विखे-पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नगर लोकसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने प्रचार करणार नाही आणि मुलगा सुजय विखे पाटील याचाही प्रचार करणार नाही, अशी घोषणा राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली होती.   Print


News - Rajy | Posted : 2019-03-19


Related Photos