महत्वाच्या बातम्या

 स्व.खासदार बाळु धानोरकर जयंती निमित्य रक्तदान शिबिराचे ४ जुलै ला आयोजन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ४ जुलै ला ११ ते ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असून रक्तदान करण्याने कोणतीही कमजोरी येत नसून ती खरी मानवता आहे.

त्यामुळे परिसरातील जनतेने रक्तदान शिबिर केंद्रावर येऊन स्व इच्छेने रक्तदान करून दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त खरी श्रद्धांजली वाहण्यात यावी असे आवाहन रक्तदान शिबिराचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस, बल्लारपूर शहर युवक काँग्रेस व गौरव परिवार, चंद्रपूर येथे केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos